Shiv Thakare Support On MNS Saam TV
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: शिव ठाकरेचं स्वप्न पूर्ण होणार? मनसेच्या अमेय खोपकरांनी पोस्ट करत म्हटलं...

‘बिग बॉस मराठी’चा विजेता शिव ठाकरेदेखील फिनालेमध्ये पोहोचला आहे. शिवला महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare Supported MNS: 'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरे सध्या दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये कमालीचा चर्चेत आहे. लवकरच बिग बॉसच्या हिंदीच्या १६व्या सिझनचा ग्रँड फिनाले मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. मराठी बिग बॉस प्रमाणे हिंदी बिग बॉसमध्ये एका हिऱ्याप्रमाणे शिव सध्या सर्वत्र चमकत आहे. 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी कोण नेणार याचे उत्तर अवघ्या काही दिवसांतच आपल्याला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा विजेता शिव ठाकरेदेखील फिनालेमध्ये पोहोचला आहे. शिवला महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

शिव ठाकरेसाठी अनेक कलाकारांसह आता काही राजकीय नेतेही पाठिंब्याच्या पोस्ट टाकत आहेत. मराठी बिग बॉसचे होस्ट व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही शिवसाठी पोस्ट केली होती. तो बेस्ट असल्याचं त्यात त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीही व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शिवला वोट देण्याचं आवाहन केलं होतं. आता मनसेकडूनही शिव ठाकरेला पाठिंबा मिळाला आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांनी शिवला ग्रँड फिनालेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मनसे नेते अमेय खोपकर पोस्ट करत म्हणतात, “आमच्या सर्वांचा अभिमान, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा”, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 'बिग बॉस १६'हा शो गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून हा शो सुरू आहे. प्रेक्षकांचा शोला मिळणारा प्रतिसाद पाहून याचा कालावधी वाढवण्यात आला होता. येत्या रविवारी म्हणजेच १२ फेब्रुवारीला या शोचा ग्रँड फिनाले मोठ्या दणक्यात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT