Aai Kuthe Kay Karte Episode Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Update (25 July): अनिरुद्ध नाही तर अरुंधतीच लग्नातला मोठा अडथळा, ईशाचा झालाय गैरसमज?

Aai Kuthe Kay Karte Serial Latest Update (25 July) : मालिकेत ईशा-अनिश यांच्या लग्नावरून धुमाकूळ सुरू आहे.

Pooja Dange

Isha Misunderstood Arundhati :

आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खूप जवळ आहे. प्रेक्षक ही मालिका जगतात असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या मालिकेत ईशा-अनिश यांच्या लग्नावरून धुमाकूळ सुरू आहे.

अनिरुद्धला वीणाने तिच्या कंपनीतून काढून टाकल्यानंतर तो खूप संतापला आहे. त्याचा राग तो ईशा आणि अनिशवर काढत आहे. अनिरुद्धने ईशा - अनिशच्या लग्नाला विरोध केला आहे. त्यामुळे संपूर्ण घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर ईशाला देशमुखाचं घर सोडून केळकरांच्या घरी राहायला गेली आहे.

काय होणार पुढच्या भागात ?

आई कुठे काय करतोय या मालिकेचं अँटोमो नुकतंच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध म्हणतोय, 'ईशा तिथे ती राहूच शकत नाही.' त्यावर संजना अनिरुद्ध म्हणते, 'म जाऊ का दिलंस तिला?' यावर अनिरुद्ध म्हणतो, 'तिला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि ती घरामध्ये परत येईल.' (Latest Entertainment News)

तर अनघा अनिरुद्धला सांगते, 'ती एकाच अटीवर परत यायला तयार आहे, जर तुम्ही तिच्या लग्नाला परवानगी दिली तर. नाहीतर अनिशशी लग्न करण्यासाठी तिला आयुष्यभर घरापासून दूर रहावं लागलं तरी चालेल.' अनघाचं हे बोलणं ऐकूण अनिरुद्धला धक्का बसतो.

तर दुसरीकडे अनघा आणि संजना अरुंधतीला भेटण्यासाठी केळकरांकडे जातात. अरुंधती या दोघींना सांगत असते की, ईशाला लग्न म्हणजे फक्त एक सोहळा वाटतो. उद्या असं नको व्हायला की घाईघाईत आपण या दोघांचं लग्न लावून दिलं आणि अनिशला त्याचा पश्चाताप झाला.' ईशा नकळत त्यांचे बोलणं ऐकते आणि गैरसमज करून घेतो. तिला वाटतं की अरुंधती देखील तिच्या लग्नाच्या विरोधात आहे.

अरुंधतीच्या बोलण्याचा ईशाने गैरसमज करून घेतला आहे. अनिरुद्धच्या लग्नला विरोध केल्यानंतर ईशा घर सोडून आली आहे. तर आता अरुंधतीला तिचे आणि अनिशचे लग्न होऊ नये असे वाटत असल्याचे समजल्यानंतर ईशा काय करणार ? ईशामुळे अनिशला काय भोगावं लागणार हे आपल्याला येत्या भागात कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT