Upcoming Popular Web Series Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Most Awaited Web Series Release Date: ‘मिर्झापूर ३’ आणि ‘पंचायत ३’ कधी होणार प्रदर्शित?, अभिनेत्यानेच सांगितली रिलीज डेट

Mirzapur 3 And Panchayat 3 Web Series Release: सध्या सोशल मीडियावर ‘मिर्झापूर ३’ आणि ‘पंचायत ३’ या वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार याची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Upcoming Popular Web Series Release Date

भारतामध्ये लॉकडाऊनपासून प्रेक्षकांचा ओटीटीकडे सर्वाधिक कल वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाचे फारसे साधन नसल्यामुळे प्रेक्षकांनी ओटीटीवर वेबफिल्म्स आणि वेबसीरीजकडे सर्वाधिक भर दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मिर्झापूर ३’ आणि ‘पंचायत ३’ ची प्रचंड चर्चा सुरू आहे. या दोन्हीही बहुप्रतिक्षित वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालेलं आहे. वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनीच वेबसीरीजबद्दल अपडेट दिली आहे.

‘पंचायत’ ही वेबसीरीज २०२० मध्ये प्रदर्शित झाली होती. वेबसीरीज प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनलाही नेटकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे, ‘पंचायत ३’ची. ‘पंचायत ३’ही वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार याविषयीची माहिती अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीतून दिली आहे. “वेबसीरीजची शुटिंग अजून थोडी बाकी आहे. ऑक्टोबरमध्ये वेबसीरीजची शुटिंग पूर्ण होईल आणि त्यानंतर त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू होईल. २०२४ मध्ये ‘पंचायत ३’ वेबसीरीज प्रदर्शित होईल,” अशी माहिती अभिनेत्रीने मुलाखतीतून दिली.

ओटीटी विश्वात ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजची प्रचंड चर्चा सुरु आहे. लोकप्रिय ठरलेल्या या वेबसीरीजचे दोन्हीही सीझन प्रचंड हिट ठरले. आता चाहत्यांना उत्सुकता आहे, ती ‘मिर्झापूर ३’ची. अनेकदा सोशल मीडियावर प्रेक्षकांसमोर ‘मिर्झापूर ३’बद्दल नवनवे अपडेट आले आहेत. कालीन भैया, गुड्डू पंडित आणि बीना भाभी यांची कथा ‘मिर्झापूर ३’ मध्ये दाखवण्यात येणार आहे. “ ‘मिर्झापूर ३’ची शुटिंग गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. सध्या डबिंगनंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. ही वेबसीरीज सुद्धा २०२४ मध्येच प्रदर्शित होणार आहे.” रॉबिनचे पात्र साकारणाऱ्या प्रियांशू पानुलीने वेबसीरीजबद्दल हे महत्वाचे अपडेट मुलाखतीतून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT