Salman Khan Poaching Case: 'त्या' काळवीटाचे होणार भव्य स्मारक
Salman Khan Poaching Case: 'त्या' काळवीटाचे होणार भव्य स्मारक Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Poaching Case: 'त्या' काळवीटाचे होणार भव्य स्मारक

वृत्तसंस्था

जयपूर - 24 वर्षांपूर्वी 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर (Salman Khan) काळवीट मारल्याचा आरोप आहे. त्या काळवीटाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. बिष्णोई समाजाचे लोक त्या काळ्या काळवीटच्या (Blackbuck) स्मरणार्थ 8 ते 10 एकर जागेवर वनस्पती आणि प्राण्यांसाठी एक संरक्षित जागा तयार करणार आहेत, जिथे हे प्राणी सहज आणि बिनधास्त फिरू शकतील. एवढेच नाही तर सलमान खानने मारलेल्या काळ्या काळवीटच्या (Black Buck) मृतदेहावर हे स्मारक बांधले जाणार आहे. (Salman Khan Latest News)

हे देखील पहा -

1998 मध्ये जोधपूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या कनकानी गावात सलमान खानने काळवीटचा शिकार केली होती, असा आरोप आहे. हा परिसर बिष्णोई समाजातील लोकांचा आहे. बिष्णोई समाजातील लोकांनी सलमान खानवर काळवीटचा शिकार केल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता, जो आजही सुरू आहे. आता त्या काळवीटला ज्या ठिकाणी पुरले होते त्या ठिकाणी त्याचे स्मारक बांधणार असल्याचे बिष्णोई समाजातील तरुणांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे.

याशिवाय त्या दहा एकर जागेवर सुमारे एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. आपल्या समाजाप्रमाणेच निसर्ग आणि प्राण्यांवरही प्रेम करा, असा संदेश या कामातून जनतेला द्यायचा आहे, असे बिष्णोई समाजातील लोकांचे म्हणणे आहे.

सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांच्या म्हणण्यानुसार, सलमानवर चार खटले सुरू होते, ज्यामध्ये प्राण्यांचा शिकार केल्या संबंधित दोन खटल्यांमध्ये तो निर्दोष सुटला आहे, ज्याला राज्याने आव्हान दिले आहे आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तिसरे प्रकरण आर्म्स अॅक्टचे आहे. ज्यामध्ये सलमान खानची निर्दोष मुक्तता झाली असली तरी राज्य सरकारने त्याला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. चौथ्या शिकार प्रकरणात सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली असून, त्याला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT