Me Honar Superstar Chhote Ustaad 2 New Host: स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’ या रिॲलिटी शोला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमात छोट्या उस्तादांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास शो सुरू करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी या शोला उत्तम प्रतिसाद दिला असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’ (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कार्यक्रमाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.
आतापर्यंत ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’ या कार्यक्रमात सुत्रसंचालनाची धुरा मराठी सिने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अन्वी जोशी या दोघांनी सांभाळली होती. या सीझनला प्रेक्षकांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या सुत्रसंचालनाचे कौतुक केले होते. गेल्या काही दिवसांपुर्वीच या शोच्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, त्यावेळी अनेकांनी या शोची होस्टिंग करणार असा प्रश्न विचारला होता. अखेर प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. हा शो येत्या १० जूनपासून सुरू होत असून शोची होस्टिंग वैदेही परशुरामी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘मनोरंजन मराठी ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजने दिलेल्या माहितीनुसार, वैदेही परशुरामी ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’चं सुत्रसंचालन करणार असल्याची माहिती दिली आहे. कार्यक्रम येत्या १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार- रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सर्वांनाच ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’मध्ये कोणकोण स्पर्धक सहभागी होणार असा सर्वांना प्रश्न पडला आहे, लवकरच प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार हे नक्की. कार्यक्रमात परिक्षक म्हणून सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे चेहरे दिसणार आहे.
सर्वांनाच आता या कार्यक्रमाची उत्सुकता लागली असून मालिकेबाबत उत्कंठा वाढली आहे. या कार्यक्रमात राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शोमधील सर्वच स्पर्धकांच्या गाण्यांनी कार्यक्रमाला चारचाँद लावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.