Aditi Sarangdhar Interview Saam TV
मनोरंजन बातम्या

Aditi Sarangdhar On Pregnancy: आदिती सारंगधरला लागलेले विचित्र डोहाळे, स्वत:च केला खुलासा

Aditi Sarangdhar Interview: अभिनेत्री आदिती सारंगधर हिसा प्रग्नेंसीच्या दिवसांत एका विचित्र गोष्टीचे सर्वाधिक डोहाळे लागले होते. याबद्दल तिने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Chetan Bodke

आदिती सारंगधर ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही 'वादळवाट' मालिकेचं नाव घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर आदिती सारंगधर येतेच. आदिती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच आदितीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये तिने तिला प्रग्नेंसीच्या दिवसांत कोणत्या गोष्टीचे सर्वाधिक डोहाळे लागले होते. याबद्दल तिने भाष्य केले आहे.

'आरपार' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदितीने सांगितले की, "मी जेव्हा प्रेग्नेंट होते, त्यावेळी सुरूवातीचे काही दिवस मी खूप आनंदित होते. मला प्रग्नेंसीच्या दिवसांत बियरचे डोहाळे लागले होते. म्हणून मी त्यावेळी प्रेग्नेंसीच्या दिवसांत खूप बियर प्यायचे. मी प्रेग्नेंट असताना केव्हाच भारतीय पद्धतीचे जेवण जेवलेच नाही. तेव्हा मी फक्त सॅलेड आणि बियर एवढेच प्यायचे आणि खायचे. 'मला प्रेग्नेंसीच्या काळात खूप कसं तरी होतंय, जर मी बियर प्यायली नाही तर राग यायला सुरुवात होते.' या विचित्र डोहाळेबद्दल मी डॉक्टरांनाही विचारले होते."

मुलाखतीमध्ये पुढे आदितीने सांगितले की, "तर मला डॉक्टर म्हणालेल्या की, घ्या बियरचे २-२ सिप. तर मी ९ महिने बियर प्यायले. भात आणि फोडणी वैगेरे आली ना तर त्या फोडणीतली मोहरी अशी काढून बाजूला काढून ठेवायचे. आमच्या घरी घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी प्रेग्नेंसीच्या काळात इंडियन फुड खाणंच बंद केलं." सध्या अभिनेत्रीची ही मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या प्रेग्नेंसीची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT