Shreya Bugade Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Shreya Bugade: जादुई प्रयोगाने श्रेया झाली गायब, अन् नवऱ्याचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ व्हायरल...

सध्या श्रेयाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shreya Bugade Viral Video: ‘चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. श्रेयाला ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमुळे एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. अनेक अभिनेत्रींची नक्कल करत, आपल्या खुमासदार पद्धतीने चाहत्यांना हसवण्याची स्टाईल सर्वांना फारच आवडते. सध्या श्रेयाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील असून सध्या सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे.

श्रेया बुगडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रेया नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच श्रेयाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जादूगर श्रेयाला एका छोट्याशा बॉक्समध्ये बसायला सांगतो.

त्यानंतर जादूगर त्या बॉक्समध्ये एक ब्लेड आणि काही ब्लॉक्स टाकतो. शेवटी तो बॉक्स हलवून दाखवतो. तर श्रेया त्यात काही दिसत नाही. उपस्थितांना त्यावेळी थोड्यावेळे करिता तरी का होईना घाम फुटला होता. श्रेया अचानक कशी अचानक गायब झाली असा सवाल सर्वांनाच पडला होता. (Entertainment News)

यावेळी श्रेयाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. श्रेयाच्या व्हिडीओपेक्षा तिनं दिलेलं कॅप्शन सगळ्यांना आवडलं आहे. श्रेयानं कॅप्शन दिलं की माझ्या नवऱ्याला ही जादु खूप आवडलीये. अशी पोस्ट करत ती यावेळी हसते. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत म्हणतात, नशिब गायब करण्याची जादु नाही केली. तर अनेकजण श्रेयाच्या या व्हिडीओवर हसत आहेत. श्रेयाचे सोशल मीडियावर 936K इतके फॉलोवर्स आहेत. (Marathi Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT