Bhau Kadam Untold Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam Birthday: भाऊच्या वाईट काळात मित्रांनीही सोडली साथ, पण फॅमिलीनं असं केलं की...

Bhau Kadam Untold Story: भाऊला त्याच्या खासगी आयुष्यात फारच घाव सोसावे लागले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनातील एक अनटोल्ड किस्सा पाहूया...

Chetan Bodke

Bhau Kadam Strugel Story: ‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रसिद्धी झोतात आलेला भाऊ कदम नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. आपल्या विनोदामुळे, कोणताही विनोद अगदी अचूक वेळी मारण्याच्या शैलीमुळे त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. आज अभिनेता भाऊ कदमचा वाढदिवस...

भाऊला प्रेक्षकांनी लांबून जरी पाहिलं तरी प्रेक्षक हमखास हसतात. त्याच्या हसवण्याच्या स्टाईलमुळे त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होते. आधी ‘फू बाई फू’ आणि नंतर ‘चला हवा येऊ द्या’ या दोन्हीही कार्यक्रमांमुळे भाऊला एकवेगळीच ओळख मिळाली. जरी भाऊ आज इतका प्रसिद्धीत असला तरी त्याचं स्ट्रगल खूप आहे.

विनोदाचा बादशहा म्हणून सर्वत्र फेमस असलेल्या भाऊला त्याच्या खासगी आयुष्यात फारच घाव सोसले. त्याची आर्थिक परिस्थिती फारच वाईट असल्याने त्याला फारच वाईट दिवसांचा सामना करावा लागला होता. त्याच्या वाईट काळात त्याच्या मित्रांनी देखील साथ सोडली होती. चला तर जाणून घेऊया त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनातील अनटोल्ड किस्सा...

एका मुलाखतीत भाऊ कदमने आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर काय दिवस पहावे लागतात याबाबतचा किस्सा सांगितला होता. एका पुरस्कार सोहळ्यासाठी त्याला दुबईला जायचं होतं, पण हातात पैसे नव्हते. त्यावेळचा किस्सा त्याने शेअर केला होता.

भाऊ कदम म्हणतो, “एका पुरस्कार सोहळ्यासाठी मी दुबईला जात होतो, आणि त्याच वेळी माझ्याकडे पैसे नव्हते. पासपोर्ट किंवा इतर सर्व खर्च माझा महेश मांजरेकर करणार होते. मला फक्त जायचे होते. पण तरी सुद्धा मी माझ्या बाजुने मित्रांकडे पैसे मागितले, माझ्या मित्रांना म्हणालो, मला ५ किंवा किमान १-२ हजार रूपये तरी द्या.. पण त्यांना माझ्यावर विश्वास नसल्याने त्यांनी मला पैसै दिले नाहीत. मी पैसे परत करणार असं म्हटलं तरी, पण त्यांनी कुणीही मला पैसे दिले नाहीत.

भाऊ पुढे मुलाखतीत म्हणतो, शेवटी माझ्या मदतीला कोणी मित्र नाही तर, घरातलीच लोकं आले. त्यांनी मला काही पैसे दिले. मी म्हणालो इतके पैसे कुठून आले, तर ते म्हणाले, अंगठी विकलीय. आणि सोबतच मला सांगितलं ही, यातील एक पैसा देखील रिटर्न घरी आणायचा नाही. तुम्ही वापरा. पण तरीही माझी पैसे वापरायची डेरिंग झाली नाही. त्या पैशात मी फक्त मुलांसाठीच गोष्टीच खरेदी केल्या.

भाऊने आपल्या सुरूवातीच्या काळात अनेक वाईट दिवसांचा सामना केला होता. पण त्याच्या उत्कृष्ट विनोदामुळे आणि अचूक विनोदाच्या पंचिंगमुळे तो इतक्या उंचीवर गेला की त्याला कशाचीही कमी नाही. त्याचा चाहतावर्ग मोठा आहेच, पण चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे तो आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT