Prasad Oak Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prasad Oak Movie: धर्मवीर-२ नंतर प्रसाद ओकचा नवा चित्रपट; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'रीलस्टार'चा फर्स्ट लूक रिलीज

Prasad Oak Movie: धर्मवीर २ च्या यशानंतर प्रसाद ओक आता नवीन चित्रपटात दिसणार आहे.

Manasvi Choudhary

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मनोरंजन विश्वात अभिनय व कौशल्याच्या जोरावर त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादने नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. अभिनयाबरोबर प्रसाद चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही करतो. धर्मवीर २ नंतर आता प्रसाद ओक नवीन चित्रपटातून आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रीलस्टार' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'रीलस्टार' या मल्टीस्टारर चित्रपटाचे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही.

'रीलस्टार'ची निर्मिती जोस अब्राहम, मोनिका कंबाती आणि निशील कंबाती यांनी जे फाइव्ह एंटरटेनमेंट्स, फोनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. 'अन्य' फेम सिम्मी आणि रॉबिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुधीर कुलकर्णी आणि रॉबिन यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'रीलस्टार'मध्ये मुख्य कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांची जणू ओळखच या पोस्टरद्वारे करून देण्यात आली आहे. पोस्टरवरील वेगवेगळ्या गेटअपमधील कलाकारांचे चेहरे लक्ष वेधून घेतात. यासोबतच 'रीलस्टार'मध्ये काहीतरी भन्नाट आणि अनोखे पाहायला मिळणार असल्याची चाहूलही देतात.

समाजात वावरताना कुठेही एखादी घटना घडली किंवा आनंदाचा क्षण दिसला की तो कॅमेऱ्यात कैद करून सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम रीलस्टार करत असतात. या चित्रपटामध्ये अशाच अनोख्या रीलस्टारची रोमांचक कहाणी पाहायला मिळणार आहे. रिलीज झालेल्या नवीन मोशन पोस्टरबद्दल, दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन म्हणाले की, रीलस्टार ही प्रत्येक सामान्य माणसाची कथा आहे ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या वाईटाला सामोरे जावे लागते आणि म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'रीलस्टार'चा फर्स्ट लुक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. प्रसाद ओकसारख्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्याच्या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आल्याने, मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षाही रीलस्टारबद्दल शिगेला पोहोचल्या आहेत. धर्मवीर-२ नंतर रीलस्टार हा प्रसाद ओक यांचा पुढचा चित्रपट असेल. निर्माता जोस अब्राहम म्हणाले की हा चित्रपट जानेवारीमध्ये पडद्यावर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT