Navra Maza Navsacha 2 Movie Shooting Starts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा २' च्या शुटिंगचा झाला श्री गणेशा, सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला व्हिडिओ

Navra Maza Navsacha 2 Movie: अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा नवरा माझा नवसाचा चित्रपट आजही सर्वांनाच आवडतो. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navra Maza Navsacha 2 Movie Shooting Begin:

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांना ओळखले जाते. सुप्रिया आणि सचिन यांचा 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळेच आता चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे 'नवरा माझा नवसाचा २' (Navra Maza Navsacha 2) येणार आहे. ५ फेब्रुवारीला सचिन पिळगावकर यांनी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या शुटिंगला आता सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सचिन पिळगावकर यांनी शेअर केला आहे. (Latest News)

'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त सचिन पिळगावकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात चित्रपटातील अनेक कलाकार दिसत आहे. सर्व कलाकार सेटवर मस्ती करताना दिसत आहे. त्यांनी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याचेदेखील सांगितले आहे. 'शूटिंग सुरु, मज्जा सुरु, नवरा माझा नवसाचा २... गणपती बाप्पा मोरया', असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे,

२००४ साली सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील त्यांचा गणपतीपुळेपर्यंत पोहचण्याचा गमतीशीर प्रवास दाखवला आहे. चित्रपटात अशोक मामा, किशोरी शहाणे अशी तगडी स्टारकास्टदेखील पाहायला मिळाली होती. चित्रपटातील गाणी, डायलॉगला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग 'नवरा माझा नवसाचा २' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

चित्रपटाचे निर्मिती आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर करणार आहेत. चित्रपटात स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगांवकर, हेमल इंगळे,अशोक सराफ, अलीसागर अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT