Jhimma 2  Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Box Office Collection: झिम्मा २ ची बॉक्स ऑफिसवर जादू, ४ दिवसांत केली बक्कळ कमाई

Jhimma 2 Collection Day 4: हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षका चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत. हा चित्रपट दिवसेंदिवस चांगली कमाई करताना दिसत आहे.

Priya More

Jhimma 2 Movie:

नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'झिम्मा २' चित्रपटाची (Jhimma 2 Movie) बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्येच बक्कळ कमाई (Jhimma 2 Box Office Collection) केली आहे.

'झिम्मा २' चित्रपटाने चार दिवसांत पाच कोटींपार कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षका चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत. हा चित्रपट दिवसेंदिवस चांगली कमाई करताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल यात शंका नाही.

'झिम्मा २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ०.९५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.७७ कोटींची कमाई केली. तर दिसऱ्या दिवशी देखील कमाईचा आकडा वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.५ कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी सोमवार असल्यामुळे या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ०.७५ कोटींची कमाई केली आहे. झिम्मा २ ने आतापर्यंत एकूण ५.५२ कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग यांनी झिम्मा २ ची निर्मिती केली आहे. तर हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या तगड्या स्टारकास्टने मुख्य भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT