Marathi Movie Get Together Released On Amazon Prime Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie On OTT : पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणारा 'गेट टुगेदर' प्रदर्शित : 'OTT'वर पाहता येणार चित्रपट

Get Together Released On OTT : पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा "गेट टुगेदर" हा चित्रपट नुकताच २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Movie Get Together Released On Amazon Prime : पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा "गेट टुगेदर" हा चित्रपट नुकताच २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार आधारित हा सिनेमा आहे.

रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या ३० जून पासून आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Latest Entertainment News)

आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर या चित्रपटातून होते. ३० जूनला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर बघता येणार आहे.

रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल यात शंका नाही.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे.

अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना समाजमाध्यमांतून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT