Gaafil Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaafil Poster Out: गोष्ट एका अनोळखी नात्याची!‘गाफील’चं पोस्टर लॉन्च, १५ डिसेंबरला येणार भेटीला

Gaafil Movie: सोशल मीडियावर आगळा- विषय सादर करणारा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Gaafil Movie Poster

मराठी प्रेक्षकवर्ग कायमच मराठी सिनेसृष्टीकडून आगळ्या-वेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगळ्याच ढंगाची कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. असे अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतल्याची उदाहरणं आहेत. यामुळे नवोदित दिग्दर्शक सुद्धा काहीतरी नवीन, हटके विषयांवर सातत्याने कलाकृती घडवण्यासाठी तयार असतात.

अशातच सध्या सोशल मीडियावर एका चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मिलिंद अशोक ढोके दिग्दर्शित ‘गाफील’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकतेच सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कथाही एका वेगळ्याची धाटणीची असणार हे नक्की. नुकतंच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून चित्रपटाबद्दलची अद्याप कोणतीही माहितीसमोर आलेली नाही. चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली.

दोन नवख्या कलाकारांना घेऊन या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे ‘गाफील’ हा चित्रपट नक्की कसा असेल, समाज नक्की कशाबद्दल गाफील आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट असेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट बघितल्यावर कळेल.

धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT