Dagadi Chawl 2 Movie News Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

चुकीला माफी नाही! लवकरच 'दगडी चाळ 2' प्रेक्षकांच्या भेटीला

नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला गेला आहे.

Shivani Tichkule

मुंबई - 'दगडी चाळ' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. दगडी चाळमध्ये मकरंद देशपांडे यांच्यासह अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) मेन लीडमध्ये झळकले होते. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियाद्वारे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा करण्यात आली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' (Dagadi Chawl 2) हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Dagadi Chawl 2 Movie News Updates)

नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या टिझरमध्ये तुफान पावसात आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहे. टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे.

हे देखील पाहा -

मंगलमूर्ती फिल्म्सने आपल्या सोशल मीडियावर टिझर पोस्ट केला आहे. यासोबतच डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी. गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव. दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’! असे कॅप्शन दिले आहे.

'दगडी चाळ'च्या निमित्ताने संगीता अहिर यांनी मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. यापूर्वी त्याणी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर आता त्या 'दगडी चाळ'चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. आता 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT