Pillu Bachelor Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pillu Bachelor Trailer: 'बाईज ४' नंतर आता 'पिल्लू बॅचलर'मधून पार्थ भालेराव येतोय तुम्हाला हसवायला, चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

Parth Bhalerao Movie: या चित्रपटामध्ये पार्थसोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Pillu Bachelor Trailer) लाँच झाला.

Priya More

Pillu Bachelor Movie:

'बॉईज ४' नंतर (Boyz 4) सर्वांचा लाडका अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao) पु्न्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पार्थचा 'पिल्लू बॅचलर' (Pillu Bachelor) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये पार्थसोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Pillu Bachelor Trailer) लाँच झाला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक पोटधरून हासत आहेत. अवघ्या काही तासांमध्येच या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून 'पिल्लू बॅचलर' हा चित्रपट प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडणार आहे. या चित्रपटामध्ये जबरदस्त स्टारकास्ट आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे आणि किशोर चौघुले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका चित्रपटात असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार असल्याचे ट्रेलरवरून दिसून येत आहे. या ट्रेलरनेच प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे.

आता या चित्रपटामध्ये पुढं नेमकं काय होणार आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समजेल. त्यासाठी तुम्हाला १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे.

अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केले आहे. तानाजी घाटगे यांनी यापूर्वी 'बस्ता', 'बरड' असे उत्कृष्ट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. या चित्रपटाला मंगेश कागणे यांनी या चित्रपटाचे गीतलेखन केले आहे. चिनार महेश यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर सूर्या मिश्रा यांनी छायांकन आणि अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT