Pravin Tarde Got Adhik Maas Gift Instagram
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde Got Adhik Maas Gift: प्रविण तरडेला मिळालं सासूरवाडीकडून ‘अधिकाचं वाण’, पत्नीने शेअर केला खास मानपान करतानाचा व्हिडीओ

Pravin Tarde And Snehal Tarde News: प्रविण तरडे आणि त्याची पत्नी, अभिनेत्री स्नेहल तरडेचा धोंड्याच्या महिन्यात मोठा मानपान करण्यात आला.

Chetan Bodke

Pravin Tarde Adhik Mas Got Special Gift: धोंड्याच्या महिन्यात जावईबापूंना सासू- सासऱ्यांकडून मोठा मान सन्मान दिला जातो. आपल्या लेकीसोबतच जावयाला सुद्धा गोडा धोडाचं जेवण घालत आपल्या मुलीला मान आणि जावयाला वाण आई- वडील देतात. हा धोंड्याचा महिना ३ वर्षांतून एकदा येत असतो.

सामान्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी देखील धोंड्याचा महिना सेलिब्रेट केला. नुकताच मराठी सिनेसृष्टीतील एका जोडीची अधिकमासामुळे बरीच चर्चा सुरू आहे. प्रविण तरडे आणि त्याची पत्नी, अभिनेत्री स्नेहल तरडेचा धोंड्याच्या महिन्यात मोठा मानपान करण्यात आला.

अभिनेत्री स्नेहल तरडे सध्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतच स्नेहलने सोशल मीडियावर अधिकमासाच्या महिन्यात प्रविणचा धोंड्याच्या महिन्यात सासुरवाडीमध्ये कशाप्रकारे मानपान करण्यात आला, याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओत स्नेहलच्या आईने जावयाला (प्रविणला) वाण देत आहे.

वाण देतानाच्या या व्हिडीओवर स्नेहलने 'जामाईबापू जिंदाबाद' असं गाणं शेअर केलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करून या जोडप्याचे भरभरून कौतुक केले आहे.

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना, ‘अधिकाचे वाण, जावईबापू अधिकमास’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडेचं कौतुक होताना पाहून चाहते देखील भारावून गेले आहेत. सध्या प्रविण तरडेचा हा मानपानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्नेहल आणि प्रविणचं लव्हमॅरेज असून त्या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे.

स्नेहल तरडे आणि प्रविण तरडे यांनी एकत्रित देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, चौक सोबतच काही प्रविण तरडे दिग्दर्शित चित्रपटातही स्नेहलने प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT