Pravin Tarde Watched Maharashtra Shaheer Facebook
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde Watched Maharashtra Shaheer: प्रविण तरडेंनी पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’; दिलं ‘इतकं’ रेटिंग...

प्रविण तरडेंनी ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिला असून त्याने खास चित्रपटाविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Chetan Bodke

Pravin Tarde Watched Maharashtra Shaheer: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट नुकताच २८ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सध्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सना शिंदे, अंकुश चौधरी सह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अनेक कलाकारांनी चित्रपटाविषयी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. अशातच नुकतीच प्रविण तरडेंनी देखील सोशल मीडियावर चित्रपटाविषयी पोस्ट केली आहे.

यावेळी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चित्रपटाविषयी तोंड भरून कौतुक केले असून कलाकारांविषयी देखील लिहिले आहे. यावेळी प्रविण तरडे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो, “ महाराष्ट्र शाहीर तुमचा आमचा सिनेमा... एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि त्यात जर ती घरातल्याच माणसावर असेल तर काय घेऊ आणि काय नको, असं होण्याची जास्त शक्यता असते. पण ती शक्यता टाळून केदारने शाहीर साबळेंचे आयुष्य काय वेगवान पध्दतीने उलगडलंय...” (Marathi Film)

https://www.facebook.com/photo.php?fbid=6390164814338073&set=a.549514328403180&type=3

सोबतच पुढे प्रविण तरडे म्हणतो, “हॅट्सऑफ मित्रा... अंकुश चौधरी हा माणुस आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणार आहे.. तू अफलातून शाहीर वठवलाय मित्रा, ते करताना फक्तं अनुभवच नाही तर मेहनतसुध्दा दिसतीये तुझी.. सना खुपच गोड दिसली आणि जणु काही तिचा दहावा सिनेमा असावा ईतका सराईत अभिनय पहिल्याच चित्रपटात केलाय.. छोट्या मोठ्या भुमिका करणारे सगळेच भन्नाट. सर्वात छोटा शाहीर एकदमच खतरनाक ठरला.. शुभांगी सदावर्ते भन्नाट, अक्षय टाकचा राजा मयेकर भारी.. निर्मिती सावंत यांनी धमाल केलीये... शाहीर साबळेंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम

केदार आणि अंकुश ला फाईव्ह स्टार रेटींग

नक्की बघा आपला महाराष्ट्र शाहीर” असं म्हणत प्रविण तरडेने आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाचे कौतुक केले आहे. (Marathi Actors)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचे शाहीर साबळे आजोबा असून केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. केदार शिंदेंची लेक सनाचे शाहीर साबळे पणजोबा आहेत. हा चित्रपट अवघ्या महाराष्ट्राला फारच भावला असून सध्या प्रेक्षकांसह सर्वच चित्रपटाचे तोंड भरून कौतुक करीत आहेत. सनाचा अभिनय देखील सर्वांनाच फार आवडला असून तिच्यावर देखील सध्या सर्व स्तरातून कौतुकाची थाप पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रकच्या मागे 'Horn OK Please' का लिहिलेले असते? यामागची रंजक कहाणी ९९% लोकांना माहीतच नाही

टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी पहिल्यांदाच थेट कॅमेऱ्यासमोर, VIDEO

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींचं CCTV फुटेज समोर

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लूक; मोरपंखी पैठणीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Panvel - Karjat : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात, कधी सुरु होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT