Kedar Shinde Wedding Anniversary Instagram/@ kedarshindems
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde Wedding Anniversary: ‘प्रिय बेला, माझ्या प्रत्येक वेडेपणात...’ केदार- बेलाच्या लग्नाची यशस्वी २७ वर्ष

Director Kedar Shinde : दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माती बेला शिंदे सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामुळे कमालीचे चर्चेत आहे.

Chetan Bodke

Kedar Shinde And Bela Shinde Wedding Anniversary: दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माती बेला शिंदे सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामुळे कमालीचे चर्चेत आहे. मराठी सिनेसृष्टीसह नाट्यसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाची एक वेगळीच छाप पाडत त्यांनी या क्यूट कपलने आपली स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

बऱ्याच मालिका, नाटकं, चित्रपटांचं (Movie) दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं आहे. या मनोरंजनसृष्टीतल्या क्यूट जोडीने आपल्या वैवाहिक जीवनाची २७ वर्ष पुर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या केदार शिंदेंनी (Kedar Shinde) आपल्या सपत्नीक एक फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माती बेला शिंदे सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामुळे कमालीचे चर्चेत आहे.

यावेळी लग्नाचे २७ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या खास पत्नीसाठी त्याने पोस्ट लिहिली आहे, त्या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतो, “प्रिय बेला. गेली २७ वर्षे, माझ्या प्रत्येक वेडेपणात माझ्या पाठीशी उभी आहेस. हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा ‘महाराष्ट्र शाहीर’ मध्ये गुंतलो, पण माझ्या कामात ढवळाढवळ न करता, तू मात्र प्रत्येक आव्हानांना तोंड दिलं. आत्ता सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही शांत संयमी राहाण्याचा नेहमीप्रमाणे सल्ला दिलास. अजून खुप काही करायचं आहे. तुला सुखात ठेवायचं आहे. त्यामुळे आणखीन वेडेपणा साठी तयार राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

२०२१ मध्ये या जोडीने लग्नाचे २५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर कमालीची चर्चा झाली होती. लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे त्या दोघांनी डिजीटल पद्धतीने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. केदारकडून प्रशांत गवाणकर आणि त्यांचे कुटुंबीय, तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी हजेरी लावली होती. सोबतच डिजीटल स्वरूपात तेव्हा अनेक मराठीसह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.  

केदार शिंदे दिग्दर्शित आणि बेला शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत पाच कोटींची कमाई पार केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एकच सध्या गर्दी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT