Rashmi Patil Engagement Saam TV
मनोरंजन बातम्या

Rashmi Patil Engagement : कारभारी लय भारी फेम रश्मीचा साखरपुडा संपन्न; पाहा कोण आहे तिचा जीवनसाथी

अशात आता मराठी मालिका विश्वातील आनखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहे.

Ruchika Jadhav

Karbhari Laybhari : मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकार आता लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच लग्नाची बेडी या मालिकेतील अभिनेता संकेत पाठक लग्न बंधनात अडकला. अभिनेत्री सुपर्णा श्यामसह त्याने विवाह केला आहे. अशात आता मराठी मालिका विश्वातील आनखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहे. (Entertainment News)

कारभारी लय भारी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अविरत राज्य केले. मालिकेतील सर्वच पात्र चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत होती. याच मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेतील अभिनेत्री रश्मी पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा साखरपूडा पार पडलाय.

साखरपुड्याचे काही फोटो रश्मीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेत. यात तिने लूक पुर्ण करण्यासाठी ग्रे रंगाचा वनपीस परिधान केला आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव अक्षय असं आहे. तो कोण आहे काय करतो ही माहिती मात्र तिने अद्याप दिलेली नाही. पुण्यातल्या महाराजा रेस्टॉरंटमध्ये या दोघांचा शाही साखरपुडा संपन्न झाला आहे.

रश्मीने कारभारी लय भारी या मालिकेत काम केलं आहे. तिच्या पात्राला अभिनेत्रीने पुर्णपणे न्याय दिला. झी मराठीवरील कारभारी लय भारी ही मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अजूनही मालिकेतील रश्मी चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

रश्मीने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा मोठा वर्षाव केला आहे. यासह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी देखील दोघांनाही साखरपुड्याच्या (Engagement) शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT