Aishwarya-Avinash Narkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya-Avinash Narkar: दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले नारकर कपल; लेक अन् जावयाचा भन्नाट डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आले हसू, पाहा VIDEO

Aishwarya-Avinash Narkar Dance Dance : मराठी सिनेसृष्टीतील सर्वांच आवडत जोडपं ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे. लेक अन् जावयाचा कमाल डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टी गाजवणार जोडप अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) नेहमीच आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असतात. अविनाश आणि ऐश्वर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ते नेहमी आपल्या भन्नाट डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या ट्रेंडिंग गाण्यावरील रील्स चाहत्यांना खूप आवडतात. या रील्स सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात.

नुकताच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या जोडीने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकरने आपले वडील आणि नवऱ्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ऐश्वर्या आणि अविनाश एका दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यांचा हा भन्नाट डान्स पाहून ऐश्वर्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खुर्चीवर बसलेल्या वडिलांचा हात पकडून अविनाश नारकर डान्स करत आहेत. ही दोघ वडिलांसमोर डान्स करत आहेत. यांचा डान्स वडील देखील खूप एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. खरतरं अविनाश आणि ऐश्वर्या वडीलांवर प्रँक करणार होते पण उलटच झालं.

ऐश्वर्याने या व्हिडीओला एक खास कॅप्शन लिहिलं आहे. जे वाचून तुम्हाला हसू येईल. "मस्ती आमच्या genesमध्ये... प्रँक करण्याचा प्रयत्न पण मस्त एन्जॉय केलं..." असे कॅप्शन दिलं आहे. तसेच 'बाबा इज लव्ह' असं व्हिडीओवर लिहिलेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहते आणि इतर कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT