Ptrajakta Mali Viral video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा अभिनयसोबत रोमँटिक डान्स, व्हिडिओ बघून तुमच्याही हृदयात वाजेल समथिंग समथिंग...

सध्या प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तिने अभिनय बेर्डेसोबत एक रोमँटिक डान्स केला आहे.

Chetan Bodke

Ptrajakta Mali Viral video: अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून यावर ती विविध अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. तिचे आगामी प्रोजेक्ट, विविध आउटफिटमधील फोटोशूट आणि 'प्राजक्तराज' संबंधित सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. सध्या प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तिने अभिनय बेर्डेसोबत एक रोमँटिक डान्स केला आहे.

हा व्हिडीओ कधीचा आहे, हे अद्याप अस्पष्ट असून तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत प्राजक्ता आणि अभिनय बेर्डे यांनी सैराट चित्रपटातील 'याड लागलं' या गाण्यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात डान्स केला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे कौतुकही केले आहे, तर काहींनी ट्रोल देखील केले आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

https://www.facebook.com/reel/706505650938557?s=yWDuG2&fs=e&mibextid=Nif5oz

'माझी तुझी रेशीमगाठ', 'रानबाजार', 'हंपी', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या प्रोजेक्टमधून अभिनयाची छाप सोडल्यानंतर प्राजक्ताने तिचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. यानंतर अभिनेत्रीने एक बिझनेसवुमन म्हणून ओळख मिळवली. अभिनेत्रीच्या 'प्राजक्तराज' या ब्रँडने फार कमी वेळेत प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळवली. पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांची विक्री तिच्या 'प्राजक्तराज' या ब्रँडच्या वेबसाइटवर केली जाते. याशिवाय अनेक अभिनेत्रींनीही तिच्या या दागिन्यांच्या ब्रँडचे कौतुक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT