Siddharth Jadhav Get Prestigious Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav News : 'जगाने म्हणावे शाब्बास रे शाब्बास...'; प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धूची खास पोस्ट चर्चेत

Siddharth Jadhav Get Prestigious Award : अभिनेता सिद्धार्थ जाधवला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील उल्लेखनीय कामगिरीमुळे 'स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.

Chetan Bodke

उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थाने फक्त मराठीतच नाही तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका असलेल्या सिद्धूच्या अभिनयासोबतच स्टाइलचेही लाखो चाहते आहेत. आज सिद्धू इंडस्ट्रीतला आघाडीचा अभिनेता आहे. नुकतंच सिद्धार्थच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतंच सिद्धूला 'स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती सिद्धूने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्याने व्हिडिओला कॅप्शन दिले की, "जगाने म्हणावे शाब्बास रे शाब्बास... ज्यांनी मराठी चित्रपटासृष्टी गाजवली, वाजवली,अभिनयाची दादागिरी केली...ते म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके सर... यांच्या नावाने दिला जाणारा 'स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' यावर्षीचा पुरस्कार अभिनय विभागासाठी मला देण्यात आला...खूप भारी फिलिंग आहे... मी "मराठी सांस्कृतिक अभियान न्यास" यांचा मनापासून आभारी आहे... त्यांनी माझी या पुरस्कारासाठी माझी निवड केली..आणि माझ्याबरोबर ज्या ज्या मान्यवर कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन...आणि तुम्ही माय बाप रसिक...असाच आशीर्वाद असावा..कायम."

सिद्धूचीही इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सिद्धार्थने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अगं बाई अरेच्चा' चित्रपटातून सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सिद्धूने 'जत्रा', 'दे धक्का', 'क्षणभर विश्रांती', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'बकुळा नामदेव घोटाळा', 'लग्न कल्लोळ' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली आहे. शिवाय, सिद्धार्थने त्याच्या अभिनय कौशल्याची छाप बॉलिवूडमध्येही उमटवली. 'सिंबा', 'सर्कस', 'सूर्यवंशी' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

सिद्धार्थ जाधव लवकरच 'ये रे ये रे पैसा ३' आणि 'नवरा माझा नवसाचा २'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय सिद्धार्थ जाधवने 'होऊ दे धिंगाणा'चं होस्ट म्हणूनही काम पाहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT