Sonalee kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर कोसळला; सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन

सोनालीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - विविध मराठी सिनेमे, रिअॅलिटी शो, ओटीटी प्लॅटफॉर्म्स या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) घराघरात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाली कुलकर्णी तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. अशातच आता सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

हे देखील पाहा -

सोनाली कुलकर्णीची आजी सुशीला कुलकर्णी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबीय शोकाकुल आहेत. काल (२१ ऑगस्ट) ही दु:खद बातमी समोर आली. सोनालीने आपल्या आजीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत याबाबद माहिती दिली. आजी, तू आमच्यात असशील... आम्ही असेपर्यंत, असं कॅप्शन देत सोनालीने या पोस्टला दिले आहे.

व्हिडीओ सोनाली आपल्या आजीसोबत मनसोक्त डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजीसोबतचा बालपणीचा एक सुंदर फोटोही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोनालीच्या दु:खात तिचे चाहतेही सहभागी झाले आहेत. शिवाय सोनालीने आजीसोबतचे काही फोटो देखील पोस्ट केले आहे. आपल्या लाडक्या नातीच्या लग्नात आजी एंजॉय करताना दिसल्या होत्या. आजीच्या जाण्याने अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आली आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा विवाह सोहळा पाहता येणार आहे. सोनालीने केलेला लग्नसोहळा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT