sonalee kulkarni good news viral Insatgram/ @sonalee18588
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni: अप्सरेने दिली गुड न्यूज ?, नेटकरी जोमात अप्सरा कोमात

नुकतीच सोनालीने आपल्या चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केल्याने चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Sonalee Kulkarni: आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रीच्या आयुष्यात काय चालतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी सोनाली सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. सोनाली नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण नुकतीच तिने एक गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्याने चर्चेत आली आहे.

लॉकडाऊनमध्ये सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत रजिस्टर मॅरेज केल्यानंतर गेल्या वर्षी लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. सोनाली कोणालातरी फोन करून 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे' असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

आता ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल. यावेळी सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा, याचाही धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हे सुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

सोनालीची ही बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी तिला दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. सोनालीचा आपल्या दमदार भूमिकेनंतर चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर सोनाली नेहमीच चर्चेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT