Sayli Sanjeev Social Media Post Instagram
मनोरंजन बातम्या

Sayli Sanjeev: सायलीचं क्रिकेट'प्रेम' संपेना, पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

रिलेशनशिपमध्ये नाहीत हे सायलीने स्पष्ट केलं असून आजही तिच्या पोस्टवर ऋतुराजच्या नावाने नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

Chetan Bodke

Sayli Sanjeev Social Media Post: सेलिब्रिटींचं आणि क्रिकेटर्सचं अफेअर्स आपल्याला काही नवं नाही. अनेक अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत लगीन गाठ बांधत आपला संसार थाटला. अशीच एक सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड. यांच्या अफेअर्सची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर होते. रिलेशनशिपमध्ये नाहीत हे सायलीने स्पष्ट केलं असून आजही तिच्या पोस्टवर ऋतुराजच्या नावाने नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

सायली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच आपल्या खास शैलीतील फोटो सायली आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या तिने एका नवीन प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. पोस्ट शेअर करत तिने सुव्रत जोशी आणि टीमबरोबरचे फोटोही शेअर केले आहेत. पण हे फोटो पोस्ट करताना तिने दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ऋतुराजचं नाव घेत तिला ट्रोल केलंय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “कुठलीही गोष्ट हॅटट्रिकला आली की भारी वाटतं आणि टेन्शन पण येतं! आज आम्ही एकत्र आमच्या तिसऱ्या प्रोजेक्टला सुरुवात केली. यावेळी पुर्णपणे नवे पिच, नवीन संघ आणि नवीन आव्हान… दोन फलंदाज तेच. आता या बॉलला सिक्सर बसेल की विकेट निघेल माहीत नाही पण आम्ही फूल फोकस्ड आहोत.” तिच्या या कॅप्शन वरून तिला युजर्सने पुन्हा एकदा ट्रोल केले आहे.

सोबतच सायली पुढे म्हणतो, “ तसंच गेल्या वर्षी ज्याने आम्हाला भरभरुन प्रेम आणि एक राष्ट्रीय पुरस्कार दिला तो "गोष्ट एका पैठणीची" या रविवारी कलर्स मराठीवर दुपारी १ आणि संध्याकाळी ६.३० वाजता दाखवणार आहेत. बघा आणि आम्हाला सांगा कसा वाटला ते.”

सायलीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत म्हणतात, “कसं एकमद जमतंय, उदाहरणं पण क्रिकेटचीच का?” तर आणखी एक नेटकरी म्हणतो, “टेक्निक चांगली आहे, मात्र यॉर्कर नीट खेळा. ऋतु…जसारखे नीट खेळा. बघा कुणाची ताकद.” अशा कमेंट सायलीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहे. तर तिला तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अद्याप सायलीने चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असून चित्रपटाबद्दल कोणतीच माहिती तिने शेअर केलेली नाही.

सायली 'काहे दिया परदेस' या मालिकेतून तिने टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केले. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहे. सायली आणि सुव्रत 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता पुन्हा एका नव्या कलाकृतीतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT