Rinku Rajguru And Akash Thosar Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru Video: '...आता हे कन्फर्म झालं', रिंकू आणि आकाशचे हातात हात घेऊन फोटोशूट; VIDEO वरून चर्चा सुरू

Ira Khan And Nupur Shikhare Wedding Reception Party: आर्ची आणि परश्याला एकत्र पाहून पुन्हा एकदा चर्चांना जोरदार सुरूवात झाली आहे. या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Priya More

Rinku Rajguru And Akash Thosar Video:

'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची-परश्याची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar) यांचा सोबत फोटोशूट करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आर्ची आणि परश्याला एकत्र पाहून पुन्हा एकदा चर्चांना जोरदार सुरूवात झाली आहे. या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर दुसरीकडे या दोघांचं आता कन्फर्म झालं असल्याच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत. हातामध्ये हात घालून पापाराझींना पोझ देतानाचा रिंकू आणि आकाश यांचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नुकताच, आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांची लग्नानंतरची रिसेप्शन पार्टी पार पडली. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्याचसोबत राजकीय नेते, बिझनेसमन, संगीत विश्वातील सेलिब्रिटी आणि क्रिडा विश्वातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीमध्ये मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली. प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोघांनी या पार्टीमध्ये एकत्र हजेरी लावली. सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. यावेळी दोघेही खूपच क्यूट दिसत होते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिंकू राजगुरूने निळी आणि पिंक कलरची काठ असलेली साडी नेसली होती. मराठमोळ्या लूकमध्ये रिंकू नेहमीप्रमाणेच खूपच क्युट दिसत होती. तर आकाश ठोसरने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. या लूकमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. आयरा- नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत दोघांनीही एकत्र येत पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. यावेळी रिंकूने आकाशच्या हातामध्ये हात घालून देखील पोझ दिली.

रिंकू आणि आकाशला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असून अनेकांनी दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. रिंकू आणि आकाशच्या या व्हिडीओवर काहींनी अशाही कमेंट्स केल्या आहेत ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, 'दोघांवर खूप प्रेम. दोघेही खूपच क्युट दिसत आहेत.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की,'दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे. आता हे कन्फर्म झालंय.' तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, 'दोघे ही मस्त दिसतात , रिंकू तर ओळखायलाच येत नाही क्युट दिसते एकदम.' अशामध्ये आता रिंकू आणि आकाश आता खऱ्या आयुष्यामध्ये एकत्र येणार असल्याच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT