Prarthana Behere Blue Bikini Photoshoot Instagram
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere Bikini Photoshoot: सुसंस्कृत प्रार्थना खरंच असंस्कृत वागली का? प्रार्थनाचे फोटो पाहून नेटकऱ्यांच्य़ा तळपायाची आग मस्तकात

Prarthana Behere Trolled On Social Media: नेहमीच साध्या आणि सिंपल लुकमध्ये पाहिलेल्या प्रार्थनाचा हाय व्होल्टेज बोल्ड लूक पाहून चाहते भलतेच भडकले.

Chetan Bodke

Prarthana Behere Blue Bikini Photoshoot: मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच आपल्या फॅशनमुळे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. नेहमीच सध्या सोज्वळ रुपात पाहिलेल्या प्रार्थनाचा सध्या बिकिनी लूक कमालीचा चर्चेचा विषय ठरला. सध्या ट्रॉलर्सने प्रार्थनाला कमालीचे ट्रोल केले असून अनेक कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरला.

नेहा- यशच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थनाचा साधं आणि सोज्वळ रूप अनुभवलं. नेहमीच साध्या आणि सिंपल लुकमध्ये पाहिलेल्या प्रार्थनाचा हाय व्होल्टेज बोल्ड लूक पाहून चाहते भलतेच भडकले.

प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काल प्रार्थनाने सोशल मीडिया अकाऊंटवर बिकिनितले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. ते फोटो पाहून नेटकऱ्यांच्या रागाचा पारा भलताच चढला असून अनेकांनी आपल्या भाषेची पातळीही पार केली.

प्रार्थनाचे फोटो पाहून नेटकरी तिला म्हणतात, “प्रार्थना हे मराठी संस्कृतीला शोभत नाही ग.” तर आणखी एक म्हणतो, “तू च राहिलीस होती.” तर दुसरा म्हणतो, “आपल्या मराठी संस्कृतीची जर जपवणूक करायची असेल, तर या पद्धतीचे फोटो शेअर करून कसे जमेल?”, एकाने थेट गौतमी सोबत तुलना करत म्हणतो, “ आम्ही उगाच त्या गौतमीला नाव ठेवायचो, पण तू सुद्धा काय कमी नाही.” अशा अनेक कमेंट करत सध्या नागरिक तिला ट्रोल करीत आहेत. (Marathi Actress)

प्रार्थनाच्या ब्लू अँड व्हाईट बिकिनितल्या फोटोंनी सोशल मीडियावर अवघ्या काही तासांतच लाखो लाईक्स मिळवले आहेत. सोबतच तिच्या फोटोंवर ट्रॉलर्सने भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत. नेहमीच सध्या लूक मध्ये दिसणारी प्रार्थना आज थेट बिकिनित दिसल्याने नेटकऱ्यांच्या जीवाचा तिळपापड झालाय. (Trolled)

प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रार्थना सध्या परदेशात संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नेहमीच ती चाहत्यांसोबत सेटवरील फोटो शेअर करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT