Prarthana Behere Start New Business Instagram
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere Start New Business: प्रार्थना बेहरे करतेय नव्या इनिंगला सुरुवात; अभिनेत्रीने नणंदेसोबत सुरू केला स्वत:चा व्यवसाय

Prarthana Behere News: प्रार्थना बेहरेने घटस्थापनेच्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत नव्या इनिंगला सुरुवात करत असल्याची माहिती दिली.

Chetan Bodke

Prarthana Behere Start New Business

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवत प्रार्थना बेहरे हिने ही आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड प्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्रीतही अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी अभिनायासोबतच व्यवसायालाही पसंदी दिली आहे. प्रार्थना बेहरेने घटस्थापनेच्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत नव्या इनिंगला सुरुवात करत असल्याची माहिती दिली.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने गेल्या काही दिवसांपूर्वी आपलं स्वतःच युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. त्या माध्यमातून ती आणि तिचा पती दोघेही चाहत्यांसोबत संपर्कात राहतात. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या नव्या बिझनेसची चाहत्यांना माहिती दिली आहे. तिचा नवा बिझनेस हा साडीचा असून तिच्या नव्या बिझनेसचं नाव ‘WeNaari’ (वी नारी) असं आहे. हा बिझनेस अभिनेत्रीने तिच्या नणंदबाई पल्लवी भिडेच्या साथीने साड्यांचा नवा ब्रॅन्ड सुरू केला आहे.

इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत प्रार्थनाने आपल्या चाहत्यांना बिझनेसची ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री लाईव्हमध्ये म्हणाली, “अनेक दिवसांपासून नवा बिझनेस सुरू करण्याची इच्छा होती, अखेर आज घटस्थापनेच्या दिवशी आमच्या नव्या बिझनेसला सुरुवात करीत आहोत. आमच्या बिझनेसचे ‘वी नारी’ असे असून मी आणि माझ्या नणंदेने मिळून हा ब्रॅन्ड सुरू केला आहे.” असं प्रार्थना आणि तिची नणंद इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये म्हणाली. नवरात्रीनिमित्त चाहत्यांना रोज वेगवेगळा रंगाच्या साड्याही पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT