Prarthana Behere Rejected Kai Po Che Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere : 'काय पो छे'मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत असती प्रार्थना बेहेरे, अभिनेत्रीला कोणत्या कारणामुळे मिळाला नकार

Prarthana Behere Rejected Kai Po Che Movie : प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही मालिका संपल्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसण्याची संधी मिळाली होती. पण तिला ती संधी मिळाली नाही.

Chetan Bodke

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेची खास ओळख आहे. प्रार्थना एक मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'फुगे', 'ती अँड ती' सह अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने स्वत:ची छाप पाडली आहे. प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही मालिका संपल्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसण्याची संधी मिळाली होती. पण तिला ती संधी मिळाली नाही.

नुकतंच याबद्दल प्रार्थनाने एका मुलाखतीत सांगितले आहे. तिला बॉलिवूड चित्रपटात कोणत्या कारणामुळे रिजेक्ट केलं ? याबद्दलचा खुलासा प्रार्थनाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे. मुलाखतीत प्रार्थनाने सांगितलं की, "मला 'काय पो छे' चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. 'पवित्र रिश्ता' मालिकेनंतर 'काय पो छे' चित्रपट येणार होता. मला त्या चित्रपटात सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. माझ्याकडून कास्टिंग डायरेक्टरने माझे फोटोही मागितले होते.

"मला चित्रपटात सुशांतच्या बहिणीची भूमिका होती. म्हणून माझ्याकडून कास्टिंग डायरेक्टरने फोटोबरोबर गुजराती भाषेतील ऑडिशनही मागितली होती. मी ती त्यांना पाठवलीही. त्यांना माझं कामही आवडलं. ते म्हणाले होते की, तुझं जवळपास काम झालं आहे. पण त्यांच्या फोनची मी वाट पाहत होते. २ ते ३ महिन्यांनंतर मला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला. त्यांनी मला फोन करून नकार दिला. कारण, त्यांना एक गोरी मुलगी हवी होती. आपल्याला कुठल्या कारणामुळे रिजेक्शन मिळतंय हे आवर्जुन लक्षात ठेवायला हवं." असं प्रार्थना बेहरेने सांगितले.

प्रार्थना एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक बिझनेस वुमनही आहे. वर्षभरापूर्वी अभिनेत्रीने आपल्या नणंदेसोबत साड्यांचा बिझनेस सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी का जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT