Pooja Sawant Bride To Be Party In Goa Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Bride To Be Party: भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरेने पूजा सावंतचं केलं 'ब्राईड टू बी'; गोव्यात ‘अशी’ केली ‘अशी’ धमाल, पाहा Video

Pooja Sawant News: अभिनेत्री पूजा सावंत आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत असून न्यू इयर सेलिब्रेशनसोबत 'ब्राईड टू बी'चंही सेलिब्रेशन करताना दिसते.

Chetan Bodke

Pooja Sawant Bride To Be Party In Goa

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी पूजा सावंत एक आहे. पूजा सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली. चाहत्यांना, तिची आणि बॉयफ्रेंड सिद्धेशची ओळख कशी झाली, याबद्दलही तिने सांगितले. जेव्हा तिने प्रेमाची कबूली दिली, तेव्हापासून तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सध्या अभिनेत्री पूजा सावंत आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यासोबतच न्यू इयर सेलिब्रेशनसोबत 'ब्राईड टू बी'चंही ते सेलिब्रेशन करीत आहे. (Marathi Actress)

नुकतंच पूजा सावंतने सोशल मीडियावर गोव्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पूजा आपल्या सेलिब्रिटी मित्रांसोबत गोव्याला गेली आहे. यावेळी पूजा सावंतसोबत गोव्याला भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकरसह त्यांचे काही मित्रही उपस्थित होते. खरंतर पूजा सावंत, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे हे तिघेही बेस्ट फ्रेंड आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. यावेळी लाडक्या मैत्रिणीच्या 'ब्राईड टू बी' पार्टीसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी ते गोव्याला गेले आहेत. (Social Media)

पूजाने तिच्या 'ब्राईड टू बी' पार्टीवेळी रेड कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस वेअर केलेला दिसत होता. त्यासोबतच तिच्या मित्रांनीही यावेळी हटके पार्टी लूक केलेला दिसत आहे. पूजाला 'ब्राईड टू बी' पार्टीमध्ये, तिच्या मित्रांनी नव्या प्रवासासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. 'ब्राईड टू बी' पार्टीचा व्हिडीओ शेअर करताना पूजाने “माझ्या सर्व लाडक्या मुसाफिरियांसोबत मोस्ट अवेटेड ट्रिप” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांकडून भूषण, प्रार्थना आणि पूजाच्या मैत्रीचं कौतुक होत आहे. (Entertainment News)

२८ नोव्हेंबरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने त्याचं नाव सांगत त्याचा चेहराही सर्वांना दाखवला. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सिद्धेश असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो फायनन्ससंबंधित काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT