Megha Ghadge Saam Tv
मनोरंजन बातम्या

Megha Ghadge: 'फिल्ममध्ये काम करायचंय तर कॉम्प्रोमाईज करावं लागेल'; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादाक अनुभव

Megha Ghadge: अभिनेत्री मेघा घाटगेने चित्रपटसृष्टीतील संघर्ष, तडजोडीचा दबाव आणि कास्टिंग काउचसारख्या अनुभवांबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्यासोबत घडलेला एक वाईट अनुभव सांगितला आहे.

Shruti Vilas Kadam

Megha Ghadge: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाटगे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोरंजन विश्वातील काही कटू वास्तवांवर भाष्य करत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. “चित्रपटांत काम करायचं असेल तर तडजोड करावी लागते, नाहीतर प्रगती होत नाही,” असे वक्तव्य करत तिने इंडस्ट्रीतील संघर्ष आणि दबावाविषयी उघडपणे मत व्यक्त केले.

मानसिक दबाव टाकला जातो

मेघा घाटगेने सांगितले की, 'करिअरच्या सुरुवातीच्या काळात मलाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. काही लोकांकडून अप्रत्यक्षपणे कॉम्प्रोमाईज करण्याचे संकेत दिले जात होते. चित्रपट किंवा मालिकांमध्ये संधी मिळवण्यासाठी कलाकारांवर अनेकदा मानसिक दबाव टाकला जातो, असेही तिने नमूद केले.

कॉम्प्रोमाइज करावं लागतं

मेघा पुढे म्हणाली की, मी मराठी चित्रपटसृष्टीत आले. त्यावेळी मी एकटी आहे. असे सर्वांना कळले. हिच्याबरोबर कुणी मॅनेजर बोलणार नाही. कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तसं केलं नाही तर पुढे जाता येणार नाही. अशा गोष्टी होत असतात, असं मला लोकांनी सांगितलं. पण मी त्यांना तिथेच थांबवायचे. पण बाहेर जाताच ते लोक चुकीच्या पद्धतीने जातं. त्यामुळे ते लोक माझी बदनामी करायचे लागले. ही याच्याबरोबर झोपली आहे, आपल्याबरोबर का येत नाही इथपर्यंत लोकांनी माझी बदनामी केली.

पार्टीत घडला धक्कादायक अनुभव

मेघाने पुढे स्पष्ट केले की, एका पार्टीत एका अभिनेत्याने माझे केस पकडले होते. तू कसली आहेस, स्वतःला शहाणी समजतेस वगैरे मला बोलला होता. मी पहिल्यांदाच पार्टीला गेले होते. तिथे जे घडलं तो अनुभव भयंकर होती. त्यावेळी त्या माणसाने सरळ माझे केस पकडले. मला काय करावं सुचलं नाही. मी तिथून निघून गेले, माझी एक मैत्रीण होती तिने त्या अभिनेत्याला रोखलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT