IRS Sameer Wankhede Saam tv
मनोरंजन बातम्या

IRS Sameer Wankhede: दाऊदच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही; अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांच्या प्रश्नांवर IRS समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर

IRS Sameer Wankhede: या कार्यक्रमात अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांच्या प्रश्नांवर आयआरएस समीर वानखेडे यांनी रोखठोक उत्तर दिलं.

Vishal Gangurde

IRS Sameer Wankhede News: झी मराठीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडची नेहमी चर्चा होत असते. अलीकडे या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकरने हजेरी लावली होती. यानंतर एनसीबीचे माजी संचालक, आयआरएस समीन वानखेडे यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांच्या प्रश्नांवर आयआरएस समीर वानखेडे यांनी रोखठोक उत्तर दिलं. (Latest Marathi News)

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात आयआरएस समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या प्रश्नांना परखड उत्तर दिले आहेत. या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. 'दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोक म्हणतात. अवधूत गुप्तेच्या या प्रश्नाला आयआरएस समीर वानखेडेंनी परखड उत्तर दिलं आहे.

आयआरएस समीर वानखेडे म्हणाले, 'हे आमच्यासाठी खूपच लहान गुन्हेगार आहेत. त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही. त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. परदेशातून धमक्या देऊ नको. त्याला आव्हान करतो की, हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे, अशा शब्दात वानखेडे यांनी अवधूतच्या प्रश्नाला परखड उत्तर दिलं.

आयआरएस समीर वानखेडे यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. समीर वानखेडे यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात आतापर्यंत बऱ्याच राजकारणी,सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, डॉ. अमोल कोल्हे, संजय राऊत, नारायण राणे यांनी हजेरी लावली आहे. यासोबत श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर यांनीही हजेरी लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा नेस्कोमध्ये होणार

ST Fare Hike : एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT