Jui Gadkari SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari : निराधार आजी-आजोबांना मायेची ऊब, जुई गडकरीने केली खास पद्धतीने दिवाळी साजरी

Jui Gadkari Diwali Celebration : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीने एका खास अंदाजात दिवाळी साजरी केली आहे. तिच्या या कृतीने तिचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

मराठी मालिकांमधील लोकप्रिय सून अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari ) तिच्या स्वभावाने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकत असते. तिला 'पुढचं पाऊल' या मालिकेने खूप लोकप्रियता दिली. सध्या जुई आता 'ठरलं तर मग' (Tharla tar mag) या कार्यक्रमात सायलीच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका लोकांना प्रचंड आवडली आहे. गेली दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच या मालिकेला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. या मालिकेतही जुईने सूनची भूमिका केली आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या कामाचे अपडेट ती देत असते. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जुई दरवर्षी एका वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करते. ती सामाजासाठी काहीतरी नेहमीच करताना दिसते.

जुई गडकरी गेले अनेक वर्ष 'शांतिवन' (Shantivan) या आश्रमात जाऊन दिवाळी साजरी करते. जिथे तिला अनेक आजी-आजोबा भेटतात. ज्यांच्यासोबत जुई छान वेळ घालवते. त्यांना मदत करते. यंदाही जुईने आश्रमाची भेट घेतली आहे. ती आश्रमातील लोकांसोबत दिवाळी साजरी करते. आश्रमात गेल्यावर जुईने एक छान गाणे देखील गायले. जुई व्हिडीओमध्ये आजी आजोबांना खाऊ वाटताना दिसत आहे. तर एक आजी प्रेमाने जुईला आशीर्वाद देत डोक्यावर हात ठेवत आहे. या व्हिडीओ चाहत्यांच्या खूप कमेंट्स येत आहेत. चाहते जुईच्या या कृतीचे खूप कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT