Hruta Durgule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: “एक बॉटल दोन ग्लास…” हृता दुर्गुळेच्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी हृता दुगुळेने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.

Shivani Tichkule

मुंबई - झी मराठी वाहिनीवर 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ म्हणजेच अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेने हजेरी लावली होती. हृता दुगुळेने तिच्या सासूबाई मुग्धा शाह यांच्यासह या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी हृता दुगुळेने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.

हे देखील पाहा -

यावेळी ती या मंचावर मंगळगौर खेळली आणि भन्नाट उखाणाही घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृताचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काही बायका हृता दुर्गुळेला मंगळागौर खेळल्यानंतर उखाणा घेण्याचा आग्रह करत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ती नकार देते पण नंतर कोणीही हसणार नाही या अटीवर ती उखाणा घ्यायला तयार होते. “एक बॉटल, दोन ग्लास… प्रतीक माझा फर्स्टक्लास…” असे भन्नाट उखाणा घेते.

हृता दुगुळे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. बस बाई बसचा हा हृता दुर्गुळे एपिसोड बराच चर्चेत राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT