Munawar Faruqui And Hemangi Kavi saam tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi: मी तुला ओळखत नाही..., मुनव्वर फारुकी हेमांगी कवीला नाही नाही ते बोलून गेला; VIDEO व्हायरल

Madness Machayenge India Ko Hasayenge: बिग बॉस 17 विनर मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) आला होता. यावेळी मुनव्वरने हेमांगी कवी विषयी असं काही बोलून गेला की त्यामुळे हेमांगीचे चाहते नाराज झाले आहेत.

Priya More

Munawar Faruqui On Hemangi Kavi:

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या चर्चेत आहे. मराठी प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांना हसवण्यासाठी हेमांगी कवी सज्ज झाली आहे. ती 'मॅडनेस मचाएंगे, इंडिया को हंसाएंगे' (Madness Machayenge India Ko Hasayenge) या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Kureshi) जजच्या भूमिकेत आहे.

हा शो येत्या ९ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा ओपनर म्हणून बिग बॉस 17 विनर मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) आला होता. यावेळी मुनव्वरने हेमांगी कवी विषयी असं काही बोलून गेला की त्यामुळे हेमांगीचे चाहते नाराज झाले आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या शोमध्ये बोलताना मुनव्वर फारुकी म्हणतो की, 'दादी हेमांगी. मला आधीच माहिती होते की इथे हेमांगी आलीये. यावर हेमांगी म्हणते, कसं? यावर मुन्नवर म्हणतो, इथे बाहेर चार महागड्या कार उभ्या होत्या आणि त्यामध्ये एक रिक्षा उभी होती. मात्र तू जेव्हा तोंड धुवून आली होतीस तेव्हा तू खूप चांगली वाटत होती. तो मेकअप होता का? यावर हेमांगी उत्तर देते, नाही. पुढे मुन्नवर म्हणतो, मेकअप असो वा नसो मी तर तुला असंही ओळखत नाही.'

मुनव्वर फारुकीने हेमांगी कवीची अशी केलेली मस्करी ही तिच्या चाहत्यांना अजिबात आवडली नाही. मुनव्वरचे हे वक्तव्य चर्चेत आले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेमांगी कवीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शएअर केला होता. या व्हिडीओनंतर आता मुनव्वर फारुकीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काहींनी हेमांगी कवीला खडेबोल सुनावले. तर काहींनी मुनव्वरची शाळा घेतली.

एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'मुनव्वरला देखील कोणीच ओळखत नव्हते.' तर दुसऱ्या युजरने हेमांगी कवीला टॅग करत लिहिले की, 'ही आपली लायकी....कशाला असले शो करून मराठी माणसांची इज्जत गमवायची...उत्तर द्यायचं ना कड्क त्याला... आत्मसन्मान आहे ना, मग वाजवायची ना त्याची तिथेच स्टेजवर...उगीच हात कशाला जोडायचे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT