Dipali Sayyed SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dipali Sayyed : दिपाली सय्यद यांची नवी सुरुवात; व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, पाहा VIDEO

Dipali Sayyed Business Woman : मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी नवीन वर्षात एका नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. याची खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. दिपाली सय्यद यांनी हिंदी, मराठी चित्रपटांत काम केले आहे. तसेच अनेक मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये देखील त्यांनी कमालीचा अभिनय केला आहे. सध्या त्या एका वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आल्या आहेत. दिपाली सय्यद यांनी नवीन वर्षाची दमदार सुरुवात केली आहे.

नववर्षाच्या निमित्ताने अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी स्वतःचे नवे हॉटेल सुरू केलं आहे. या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी त्यांचे नवीन हॉटेल साईबाबांच्या शिर्डीत सुरू केले आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या नवीन हॉटेलचे नाव खूप हटके ठेवले आहे. 'मनी हॉटेल अँड रेस्टॉरंट' असे त्यांच्या हॉटेलचे नाव आहे.

आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या हॉटेलला भेट दिली आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या हॉटेलची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला त्यांनी खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "नवीन सुरुवात..." दिपाली सय्यद यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

दिपाली सय्यद यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हॉटेलची एक झलक पाहायला मिळत आहे. ज्यातून हॉटेलचे इंटिरियर खूप हटके असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत. यात लग्नाची वरात लंडनच्या दारात आणि मुंबईचा डबेवाला हे चित्रपट खूप प्रसिद्ध झाले आहेत. दिपाली सय्यद यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT