Victoria Movie Poster Instagram/ @virajas13_official
मनोरंजन बातम्या

Latest Marathi Movie: 'व्हिक्टोरिया'मध्ये 'ती' अक्राळ विक्राळ रुपातली महिला कोण? पोस्टर चर्चेत

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील एक नवा पोस्टर दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकार दिसत असून त्यांच्यामागे एक स्त्री दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Victoria Poster: विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'व्हिक्टोरिया' चित्रपटाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वी परदेशात पार पडला. तेव्हापासून चित्रपटाची चर्चा रंगत असून चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे पार पडले. (Marathi Film)

निर्माते आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विराजस कुलकर्णी पहिल्यांदाच दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विराजससोबत जीत अशोक यांनीही केले आहे. (Marathi Entertainment News)

विराजसने आतापर्यंत अनेक मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटातील कलाकारांचा पहिला लूक प्रदर्शित करत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली होती.

आता या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. विराजस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. कालच त्याने आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. (Social Media)

या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni) हे कलाकार दिसत असून त्यांच्यामागे एक स्त्री दिसत आहे. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत भयंकर दिसत आहेत. (Marathi Actress)

हे पोस्टर शेअर करत विराजसने लिहिले की, “जीत अशोक आणि मी दिग्दर्शित केलेला मराठी हॉरर सस्पेन्स चित्रपट… ‘व्हिक्टोरिया’! ती येत आहे…१६ डिसेंबरपासून सिनेमागृहात…” या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विराजसच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकार मित्रांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (Marathi Actors)

चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरपासून सिनेमाघरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy F17 5G: कमी बजेटमध्ये मोठा धमाका! Samsung Galaxy F17 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update: ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Shrikhand Recipe: दसरा स्पेशल डीश; घरीच करा गोड श्रीखंड पुरीचा बेत, वाचा सोपी रेसिपी

Delhi High Court: दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस अलर्ट मोडवर; संपूर्ण परिसर केला रिकामा

OTT Releases This Weekend: हा आठवडा होणार धमाकेदार! 'या' आठवड्यात मिळणार रोमान्स, क्राईमचा डबल डोस

SCROLL FOR NEXT