Vikram Gokhale New Serial  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale: विक्रम गोखले साकारणार गायकाची भूमिका; चाहत्यांना भूमिकेची उत्सुकता

'अग्निहोत्र' या प्रसिद्ध मालिकेत काम केल्यानंतर अभिनेते विक्रम गोखले पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील एका मालिकेतील त्यांचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मालिकांसह चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे विक्रम गोखले पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनवर (Marathi Entertainment News) झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. आतापर्यंत नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला होता. त्यांनी मनोरंजनविश्वातील वेगवेगळ्या भूमिकेतून स्वत:ची ओळख निर्माण केली. (Marathi Actor)

अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते आता पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र मालिकेत विक्रम गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यानंतर आता परत एकदा 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून मुख्य भूमिका साकारत पदार्पण करत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आघाडीवर आहे. (Latest Marathi News)

मालिकेत प्रेक्षकांना मल्हार कामत सोबत स्वराजचा सांगितिक प्रवास अनुभवता येणार आहे. या मालिकेत आता जेष्ठ कलाकार विक्रम गोखले यांची एन्ट्री होणार आहे. जेष्ठ कलाकार विक्रम गोखलेंनी गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले असून मालिकेत मल्हारने गाण्याचे शिक्षण गुरु पंडित मुकूल नारायण यांच्याकडून गाण्याचे शिक्षण घेतले.

यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. विक्रम गोखलेंनी साकारलेले पात्र चाहत्यांच्या मनात अजूनही कायम आहे. आता अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर या मालिकेत साकारत असलेल्या व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी ते उत्सुक असून लोकप्रिय मालिकेबरोबर नव्या पिढीबरोबर काम करताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT