Vijay Kadam Film Career Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Kadam Careeer : विनोदाचा बादशहा जाता जाता रडवून गेला, विजय कदम यांच्या चित्रपटातील भूमिका पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Chetan Bodke

मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या भूमिका लीलया पार पडणारे सेलिब्रिटी म्हणजे विजय कदम. विजय कदम यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांची कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांन खळखळून हसवले आहे.

विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलं, देखणी बायको नम्याची, पोलिस लाईन, चश्मेबहाद्दर, दे दणादण, सासू नंबरी जावई दस नंबरी, धुरंधर भातवडेकर सारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्या शिवाय, भिकाजी राव करोडपती, ती परत आलीये आण शेजारी शेजारी पक्के शेजारी सारख्या अनेक टिव्ही सीरीयलमधून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची मैत्री मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वश्रृत आहे. त्या दोघांचीही मैत्री १९७८ पासूनची आहे. त्यांनी दोघांनीही अनेक नाटकात एकत्र भूमिका साकारल्या आहेत. फक्त रुपेरी पडद्यावरच नाही तर रियल लाईफमध्येही ते खूप चांगले मित्र होते.

आपल्या विनोदी शैलीमुळे चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या विजय कदम आपल्या आजारपणामुळे गेले कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होते. त्यांनी अभिनय क्षेत्रात १९८० मध्ये छोट छोट्या भूमिका साकारत पदार्पण केले. त्यांना कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT