Marathi Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: "स ला ते स ला ना ते' चित्रपटात उपेंद्र लिमये दिसणार अनोख्या भूमिकेत, साकारणार हसनभाईची व्यक्तिरेखा

Sa La Te Sa La NaTe Movie: 'स ला ते स ला ना ते' मध्ये हसनभाईची भूमिका साकरणार असून त्यांची भूमिका काय असणार या विषयी उत्सुकता आहे.

Manasvi Choudhary

जोगवा, अॅनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता 'स ला ते स ला ना ते' या अनोखं नाव असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं असून, 'स ला ते स ला ना ते'मध्ये हसनभाईची भूमिका साकरणार असून त्यांची भूमिका काय असणार या विषयी उत्सुकता आहे.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे.

वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांच्या उमलणाऱ्या नात्यात अनेक व्यक्तिरेखा येतात. उपेंद्र लिमये यांची भूमिकाही त्यापैकीच एक आहे. एका खाणमालकाची भूमिका उपेंद्र लिमये करत आहेत. त्यामुळे अतिशय वेगळ्या अशा या कथानकावरील 'स ला ते स ला ना ते' हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. आता हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT