Bai Ga Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: 'नाच गं घुमा'च्या निर्मितीनंतर स्वप्निल जोशी'बाई गं'मध्ये करणार अभिनय, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

Bai Ga Movie: नुकताच स्वप्निलने निर्मिती विश्वात पदार्पण करणार असल्याची खुशखबर देत 'नाच गं घुमा'ची घोषणा केली. त्यानंतर लगेचच स्वप्नील 'बाई गं' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Swapnil Joshi Movie:

मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. स्वप्निल जोशीने नुकताच निर्मिती विश्वात पदार्पण केले. त्याने नुकताच 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या घोषणेनंतर स्वप्निल जोशी अजून एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करतान दिसणार आहे. 'बाई गं' (Bai Ga Movie) असं स्वप्निल जोशीच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. येत्या 14 जून 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2024 वर्ष स्वप्नील जोशीसाठी विविध भूमिकांच ठरणार असून तो अनेक नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या विषयावर चित्रपट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच स्वप्निलने निर्मिती विश्वात पदार्पण करणार असल्याची खुशखबर देत 'नाच गं घुमा'ची घोषणा केली. त्यानंतर लगेचच स्वप्नील 'बाई गं' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती, अभिनय आणि अजून बऱ्याच विविधांगी रूपातून स्वप्नील येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहते देखील त्याच्या या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

स्वप्निल जोशीचा 'बाई गं' हा चित्रपट येत्या 14 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशीसोबत अजून कोण-कोण दिसणार हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. 2024 या वर्षात स्वप्नील स्त्री सक्षमीकरण असलेल्या चित्रपटाच्या सोबतीने अजून काय वेगळं करणार याची उस्तुकता सगळ्यांना लागली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट आगळावेगळा असणार यात काही शंका नाही.

'बाई गं' चित्रपटाबद्दल स्वप्नील जोशीने सांगितले की, 'नाच गं घुमानंतर लगेच बाई गं सारखा चित्रपट करणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात मी काय करतोय हे सगळ्यांना सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 2024 मध्ये खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय यासारखं वेगळं सुख काय असणार ना! निर्मितीसोबतीने अभिनय करत राहून 2024 वर्षात खूप प्रोजेक्ट्समधून काम करणार आहे आणि बाई गं नक्कीच काहीतरी खास असणार आहे हे नक्की. म्हणून प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. पण लवकरच या चित्रपटा बद्दल अनेक गोष्टी शेयर करण्यासाठी मी देखील उत्सुक आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT