Subodh Bhave Lord Ganesha Decoration Instagram @subodhbhave
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave Celebration: याला म्हणतात जरा हटके! बाप्पासाठी सुबोध भावेने 'चांद्रयान ३' उभारले; पाहा फोटो

Ganesh Chaturthi: अभिनेता सुबोध भावेच्या घराचं डेकोरेशन खुप भारी आहे.

Pooja Dange

Subodh Bhave Share Photo:

देशभरात गणेश चतुर्थीची धूम आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. सर्वांसाठी त्यांचा बाप्पा खास असतो. आपल्या बाप्पाची सजावट भारी कशी होईल यासाठी सगळे प्रयत्न करत असतात.

या सजावटीत कलाकार मंडळी देखील मागे नाहीत. आपल्या बाप्पासाठी स्पेशल काहीतरी करत असतात. अभिनेता सुबोध भावेच्या घराचं डेकोरेशन तसंच भारी आहे.

सुबोध भावेने नुकतेच त्याच्या घराच्या गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुबोधच्या घराच्या गणपतीला चांद्रयान ३चं डेकोरेशन करण्यात आला आहे. चांद्रयान ३, चंद्र, चंद्रावर उतरलेलं प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर या देखाव्यात दाखविण्यात आले आहेत. तर चंद्रावर येथे हे यान उतरले त्या 'शिव शास्त्री' असे नाव देण्याच आलं ते देखील देखाव्यात दाखविण्यात आले आहे.

सुबोध भावेने हे फोटा पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'गणपती बाप्पा मोरया! यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा "चांद्रयान 3" श्री गणेश आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना, मोरया.' (Latest Entertainment News)

सुबोध भावेच्या मुलांनी साकारलेला हा देखावा अप्रतिम आहे. 'चांद्रयान ३'फार सुंदर पद्धतीने त्यांनी साकारले आहे. सुबोधच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करून कौतुक करत आहेत. (celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोलिओ डोस अन् लस दिल्यानंतर भयंकर घडलं, अवघ्या १० मिनिटांत बाळाचा मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

Thursday Horoscope: दिवसाची सुरुवात आनंदात होणार, 5 राशींना पैशाच्या अडचणी येणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे ६ मोठे निर्णय; मंत्री-अधिकाऱ्यांसाठी आदेशच काढले

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन, उन्हाळ्यात निसर्गाच्या कुशीत मारा फेरफटका

Better sleep tips: रात्री शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी हे काम नक्की करा

SCROLL FOR NEXT