Siddharth Jadhav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav: हे सगळंच स्वप्नवत! सिद्धार्थ जाधवला बक्षीस म्हणून मिळाली लाखोंची आलिशान कार, पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना

Siddharth Jadhav Got A New Car AS a Prizr: सिद्धार्थने सोशल मीडियावर कारसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Manasvi Choudhary

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या चर्चेत आला आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयासह हटके स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी कलाविश्वासह सिद्धार्थने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाहावरील 'आता होऊ दे धिंगाणा' या शोचे सूत्रसंचालन करत आहे. सिद्धार्थला बक्षीस म्हणून लाखोंची आलिशान कार गिफ्ट करण्यात आली आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर कारसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

काय आहे सिद्धार्थ जाधवची पोस्ट?

सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की , सिद्धार्थ परिवारासह नवीन कारची पूजा करताना दिसतोय. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये सिद्धार्थने '#आपला सिद्धू. न मागताच मिळाले आज खूप काही... स्टार प्रवाह, श्री प्रसाद क्षिरसागर, सुमेध म्हात्रे, फेम्स प्रॉडक्शन कंपनी आणि सतीश राजवाडे सर यांचा मी आभारी आहे. मराठी टेलिव्हीजन इतिहासामधला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षापूर्वी "इंडियन आयडॉल" च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. आणि ते बघून खूप आनंद झाला होता.

पुढे त्याने, आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर "आता होऊ दे धिंगाणा" सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि ज्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे. खुप मस्त वाटतंय. आता होऊ दे धिंगाणा...!'

सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

सोशल मीडियावर सिद्धार्थच्या पोस्टवर सेलिब्रिटीसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं तर, आगामी काळात सिद्धार्थ जाधव नवरा माझा नवसाचा या चित्रपटात दिसणार आहे. अलिकडेच सिद्धार्थने याबाबतची माहिती दिली होती. तेव्हापासून चाहते सिद्धार्थला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या रत्नागिरीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू असून चित्रपट २०२४च्या अखेरीस प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : हात-पायांवरील नकोसे केस कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे उपाय

ITR Deadline 2026: ३१ जुलैची डेडलाइन चुकली? आता ITR भरताना 'हा' दंड बसणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ठाकरेंच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने दिला अल्टिमेटम, राज्याच्या राजकारणात खळबळ

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गर्दी

SCROLL FOR NEXT