Santosh Juvekar Playing Historical Role  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar Movie: रावडी भूमिका साकारणारा संतोष दिसणार ऐतिहासिक भूमिकेत, रावरंभात साकारणार 'जालिंदर'

Santosh Juvekar Playing Historical Role In Ravrambha: आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात संतोष जुवेकर प्रथमच ऐतिहासिक पात्र साकारणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Santosh Juvekar Playing Historical Role: अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत संतोष झळकणार आहे.

संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची ही भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे यात पहायला मिळणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या खास भूमिकेबद्दल संतोष जुवेकर म्हणतो, “‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे.” (Entertainment News)

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. १२ मे ला 'रावरंभा' हे मोरपंखी पान प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. (Marathi Actors)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT