Sankarshan Karhade Post  Instagram @sankarshankarhade
मनोरंजन बातम्या

Sankarshan karhade : '३६ दिवस,२१ विमान प्रवास, हजारो मैलांचं अंतर...' अमेरिका दौऱ्यावर संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

Sankarshan Karhade Post : संकर्षण 'नियम व अटी लागू' या नाटकासाठी अमेरिका दौऱ्यावर गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sankarshan Karhade Post For America :

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, चित्रपट आणि नाटकातून घराघरात पोहचला आहे. संकर्षण नेहमी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. संकर्षण फक्त अभिनयच नव्हे तर कविता, सूचसंचालनामुळेही चर्चेत असतो. संकर्षण सध्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिका दौऱ्यासाठी संकर्षणने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण 'नियम व अटी लागू' या नाटकासाठी अमेरिका दौऱ्यावर गेला आहे. एका महिन्याहून अधिक वेळ संकर्षण आणि त्याची टीम अमेरिकेत नाटकाचे प्रयोग करत आहे. संकर्षणने अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील अनुभवाबद्दल संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षणची पोस्ट

'अमेरिकेने दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. LOVE YOU.नियम व अटी लागू नाटकाचा आज अमेरिकेतला १३ प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला. आजच्या #tampa च्या प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकुण ३६ दिवस , २१ विमान प्रवास , हजारो मैलांचं अंतर , १३ शहरं , नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळुन आलेले , भेटलेले , जवळपास ५००० मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम.

अमेरिकेच्या ह्या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सग्गळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने १३ वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं.. त्यांनी खूप प्रेम दिलं. काही ठिकाणी माझ्या घरच्या सारखा गणेशोत्सव होता , तर काही घरांतल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची.. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर , काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात ऊभं बघून मलाही रडू आलं..

कामासाठी , नोकरीसाठी , कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली हि सगळी मराठी माणसं , कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत. हे सगळं समृद्ध करणारं आहे..

ह्या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे… फार फार आठवण येतीये. आता कान आतूर झालेत ऐकायला कि , “कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय हवाई अड्डे पर उतरेगा. ११ oct ला पहाटे पोहचतो आणि मग भेटूच'. असं म्हणत संकर्षण मायदेशी परतणार असल्याची माहिती सर्वांना दिली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने अमेरिकेचे आभार मानत ही पोस्ट शेअर केली. अमेरिकेतील अनेक आठवणी शेअर केल्या. गणेशोत्साव घरच्यासारखा वाटला असं संकर्षणने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'नियम व अटी लागू' नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमुख ,प्रसाद बर्वे मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT