Sandeep Pathak Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Sandeep Pathak News : वाह शाब्बास! स्वतः मोठा अभिनेता, पण नाटकाला आलेल्या प्रेक्षक महिलेच्या पाया पडला, संदीप पाठकचा मनाला भावणारा VIDEO

Sandeep Pathak Viral Video : संदीप पाठक मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. संदीप सध्या 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून अभिनेता शेवटचा 'अल्याड पल्याड' चित्रपटात दिसला होता.

Chetan Bodke

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक संदीप पाठक आहे. त्याने मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे इंडस्ट्रीमध्ये त्याचे लाखो चाहते आहेत. विनोदी आणि गंभीर भूमिका संदीपने लिलया भूमिका साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसतो. अशातच संदीप पाठक एका नाटकामुळे चर्चेत आहे. त्याचं नाव आहे, 'वऱ्हाड'. 'वऱ्हाड' नाटकाच्या माध्यमातून तो महाराष्ट्रात दौरा करीत आहे.

विलेपार्लेमध्ये संदीप पाठकच्या 'वऱ्हाड' नाटकाचा अंक होता. या अंकाला प्रेक्षकांकडून भर पावसातही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये संदीपच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असतानाही गिरगावहून विलेपार्लेमध्ये एक महिला प्रेक्षक त्याचं खास नाटक पाहायला आल्या होत्या. भर पावसातही प्रेक्षक नाटक पाहायला आल्यामुळे अभिनेता भावुक झाला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, भर पावसातही त्या आल्यामुळे अभिनेता त्या महिला प्रेक्षकाच्या पाया पडला. यावेळी त्या महिला प्रेक्षकाने संदीपच्या संदीपच्या अभिनयाचेही खूप कौतुक केले. व्हिडिओ शेअर करताना संदीपने कॅप्शन दिले की, "मुंबईत सध्या प्रचंड पाऊस आहे तरिही नाटक बघण्यासाठी ह्या काकू गिरगावाहून विलेपार्ले येथे आल्या. असे मायबाप रसिक नाटकाला येतोत तेव्हा आमची जबाबदारी अधिक वाढते." असं कॅप्शन दिले आहे. नंतर पुढे संदीपने बोरिवली, मुलुंड आणि पुण्यातील 'वऱ्हाड' नाटकाचा टाईमही चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे.

संदीप पाठक विषयी सांगायचे तर, तो मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. संदीप सध्या 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून अभिनेता शेवटचा 'अल्याड पल्याड' चित्रपटातही दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT