Bhumika Marathi Natak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhumika : आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला एक 'भूमिका'...; तगडा अभिनेता २१ वर्षांनी गाजवणार रंगभूमी

Bhumika Marathi Natak: चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित सचिन खेडेकर आणि समिधा गुरु यांच्या ‘भूमिका’ या नाटकाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. भूमिका या नाटकाच्या निमित्ताने एक सशक्त कलाकृती नाट्यरसिकांना पहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bhumika Marathi Natak: 'गेट वेल SOON!', 'हॅम्लेट', 'हसवा फसवी', 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी', 'युगान्त', 'संज्या छाया', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'चारचौघी', 'आज्जी बाई जोरात' आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे.

आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक 'भूमिका' येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते... असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या 'भूमिका' या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत.

अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका,  नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती,  तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी  ठरल्या आहेत. सचिन खेडेकर यांसोबतच समिधा गुरू, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर यांच्याही दमदार भूमिका या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

क्षितीज पटवर्धन यांनी ‘भूमिका’ नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ नाटकाचा शुभारंभ २८ मार्चला होणार आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अशोक पत्की यांचे आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके तर रंगभूषेची जबाबदारी उलेश खंदारे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा  प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके तर निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद  पद्माकर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT