Marathi Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट

Marathi Actor mother Death : मराठी अभिनेत्याच्या आईचे निधन झाले आहे. सुनेने सोशल मीडियावर पोस्ट करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्याच्या आईचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.

अभिनेत्याच्या बायकोने ही दुःखद बातमी सांगितली आहे.

मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचे निधन झाले आहे. मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता प्रसाद जवादेच्या आईचे दुःखद निधन झाले. वयाच्या 65 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रसादची आई प्रज्ञा जवादे काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र काल (28 डिसेंबर 2025) ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसाद जवादेची बायको आणि प्रज्ञा जवादेची सून अभिनेत्री अमृता देशमुखने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. तिने लिहिलं की, "कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आज, २८ डिसेंबर २०२५ रोजी, त्यांचे दुःखद निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य, आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील. मम्मी आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येतेय"

'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात प्रसादच्या आईला कॅन्सर असल्याचे समजले. प्रसादचे आईसोबतचे नाते खूप खास होते. या कठीण काळात तो आईसोबत खंबीरपणे उभा होता. त्याच्या आईची इच्छा होती की, प्रसादने मालिकांमध्ये काम करावे. तेव्हा प्रसाद 'पारू' मालिका करत होता. प्रसादने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

prasad jawade mother passed away

वर्कफ्रंट

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन सृष्टीत क्यूट कपल आहे. दोघे कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. दोघांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रसाद 'पारू' सोबतच 'कन्यादान', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'कुलस्वामिनी' अशा अनेक मालिकांमध्ये झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

SCROLL FOR NEXT