Kushal Badrike New Year Resolution  Instagram/ @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike News: 'शब्दरूपी कट्यार काळजाला भिडली…'; कुशल बद्रिकेच्या नव्या वर्षाच्या संकल्पाचं नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक

Kushal Badrike Post: कुशलने सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नव्या वर्षात कोणता नवा संकल्प केला आहे, याबद्दल सांगितले.

Chetan Bodke

Kushal Badrike New Year Resolution

नववर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवसच उरले आहेत. जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण वर्षाच्या सुरूवातीला नवीन संकल्प करतात. आपण या संकल्पांमध्ये काम, आरोग्य यासारख्या गोष्टींचा संकल्प करतो. पण अभिनेता कुशल बद्रिकेने यावर्षी एक नवा संकल्प केला आहे. कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतंच कुशलने सोशल मीडिया पोस्टमधून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नव्या वर्षात कोणता नवा संकल्प केला आहे, याबद्दल सांगितले. (Social Media)

सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिनेता कुशल बद्रिके म्हणतो, “ह्या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घर करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे हे वर्ष सुद्धा, “व्याजाचा हप्ता” जावा तसा माझ्यातला थोडा “innocence” घेऊन गेलंच. मी invest केलेल्या “FD” प्रमाणेच माझ्यातही “maturity” आली नाही, ती नाहीच ! बहुतेक कुठे “invest करावं” आणि कुठे “invest व्हावं” हे मला खरच कळत नाही.” (Marathi Actors)

“मित्रांनी सांगितलंय नवीन वर्षात जाताना कोणत्याच emotions च baggage सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालोय. बाकी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे, “investment” ला “maturity” येऊ दे, आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी.” अशी पोस्ट त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दरम्यान, कुशलच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही विविध कमेंट्स केल्या आहेत. सिद्धार्थ जाधवने लव्ह यू भावा म्हणत त्याच्या संकल्पाचे कौतुक केले. तर विजु माने यांनी ‘मनाची घरं ठरवून भरता येत नाहीत आणि ठरवून रिकामी सुद्धा करता येत नाहीत. माती सारखं असतं मन. तिथं कदाचित एखादं झाड उगवून येईल, त्याला लटकून एखादी वेल वर चढेल आणि त्यांना नको असताना तणही उभं राहील. मातीला दोष देऊन फायदा नाही आणि तणाचा द्वेष करून उपयोग नाही. आपण आपल्या मनाची माती सुपीक कशी राहील हे पाहायचं. उगवणं आणि तगवणं दोन्ही आपल्या हातात नाही.’ अशी कमेंट केली आहे.

तर कुशलचे फॅन्स त्याला म्हणतात, “ही शब्दरूपी कट्यार काळजाला भिडली, दादा.” दुसऱ्या एक युजर म्हणतो, “भारीच… भावनांची investment नको. फार Risky trade आहे.” अशा विविध प्रतिक्रिया अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

Maharashtra Live News Update: डॉक्टर निर्भया प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे, उद्या वडवणी शहर बंदची हाक

Bhopalyache Appe Recipe : भोपळ्याची नावडती भाजी होईल आवडती, झटपट नाश्त्याला बनवा खमंग आप्पे

Shehnaaz Gill: सुकून भी गुलाबी होता है...; शहनाज गीलचा नवा गुलाबी लूक पाहिलात का?

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT