Raghuveer Khedkar Support Maratha Aandolan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raghuveer Khedkar: मराठा आरक्षणाला तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांचा पाठिंबा, पुढचे १५ दिवस कार्यक्रम न करण्याचा निर्णय

Raghuveer Khedkar Support Maratha Aandolan: इंदोरिकर महाराज यांच्या पाठोपाठ आता तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी देखील मराठा आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे.

Priya More

Raghuveer Khedkar News:

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समजाला आरक्षण (Maratha Arakshan) मिळावं यासाठी राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं, जाळपोळ, रास्तोरोको केले जात आहेत. आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

त्याच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाला राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तीचा एकापाठोपाठ एक पाठिंबा मिळत आहे. किर्तनकार इंदोरिकर महाराज यांच्या पाठोपाठ आता तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी देखील मराठा आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. पुढील १५ दिवस तमाशाचे कार्यक्रम करणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दसऱ्यानंतर तमाशा फडाचा राज्यात दौरा सुरू होतो. पण जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत 15 दिवस कार्यक्रम न करण्याचा निर्णय रघुवीर खेडकर यांनी घेतला आहे. यावेळी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला. इंदुरीकर महाराजांनी त्यांचे सर्व कार्यक्रम पुढचे ५ दिवस रद्द केलेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदुरीकर महाराज जरांगेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आजपासून पुढचे ५ दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. राज्यातील ठिकठिकाणी आंदोलनं चिघळली आहेत. सोमवारी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांची घरं आंदोलकांनी पेटवून दिली. सध्या या आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदार, सरपंच, नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT